प्राध्यापक चंद्रशेखर भारती यांना पीएचडी पदवी प्राप्त

chendrashekhar-bharati

ओझर्डे : चंद्रशेखर भारती यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष, पूर्व केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष माननीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

प्राध्यापक चंद्रशेखर भारती यांचा संशोधनाचा विषय व्यंकटेश माडगूळकर यांचे फक्त वाद्य एक समाजशास्त्रीय अभ्यास असा आहे. त्यांना तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सौ. रंजना नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर देसाई व कार्यरत असणारे सर्वच गुरुजन यांचे मौलिक मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. प्राध्यापक चंद्रशेखर भारती हे भाडळी गावचे रहिवासी असून सध्या जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय वाई येथे मराठी विभागात तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यांच्या पीएचडीच्या कामात आदरणीय प्रतापराव भोसले भाऊंचा आशीर्वाद तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मदनदादा भोसले यांची प्रेरणा तसेच संस्थेचे सचिव सन्माननीय डॉ. जयवंतराव चौधरी व प्राचार्य डॉ. भालेराव यांचे प्रोत्साहन मराठी विभागातील सहकारी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृद्ध व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्ग मार्गदर्शन मिळाले. प्राध्यापक चंद्रशेखर भारतीयांना पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे वाईट तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे. 000

Share this story