बामणोलीचे जुने बोट क्लब ऑफिस पुन्हा पाण्यामध्ये कोयना धरणाची पुन्हा सेंच्युरी

bamnoli-boat club

सातारा : चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरण शंभर टक्के भरले असून कोयनामाईने पर्यटन स्थळ असलेल्या बामणोली तील घरांना स्पर्श केला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण परिसरात गेल्या चार दिवसापासून सातत्याने मोठा पाऊस होत आहे. या पावसामुळे 22 जुलै च्या अतिवृष्टी मध्ये भरलेले कोयना धरण अगोदरच ओव्हरफ्लो झाले आहे. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने 105 टीएमसी क्षमता असलेले हे धरण शंभर टक्के भरले आहे.

कोयना धरणाच्या भिंती पासून ते तापोळा पर्यंत शंभर किलोमीटरचा परिसर व्यापलेला हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे वर्षभराची वीज निर्मिती, पिण्याच्या पाण्याची सिंचनाची, चिंता मिटली आहे. कोयना धरणात महाबळेश्वर पासून ते कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागा मधून पाण्याचा मोठा प्रवाह येत असतो. कोयना धरणाच्या भिंतीपर्यंत पसरलेला हा सर्व भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात येत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे. भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कांदाटी खोऱ्यातील लामज गाव याच विभागात येते त्यामुळे सातत्याने या ठिकाणी प्रचंड पाऊस होत असतो त्यामुळे कोयना धरण परिसर हा पावसाचे आगार मानला जातो. बामणोली हे वर्ग दर्जा पर्यटन स्थळ असून या ठिकाणी सातत्याने पर्यटकांची वर्दळ असते.

सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पातील राखीव क्षेत्रातील वासोटा किल्ला हा ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी जाण्यासाठी बामनोली मधून बोट पकडावी लागते. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी बोटिंग ट्रेकिंगसाठी गर्दी असते कोयना धरणाची पाणी बामनोली गावातील घरांना लागले असून बोट क्लब चे जुने ऑफिस पाण्याखाली गेले आहे. या ठिकाणी पाण्याच्या लाटा घरांना धडकत दरवर्षी धरण भरल्यानंतर दरवर्षी कोयना माई बामणोली गावाला स्पर्श करते. फोटो - बामणोली - कोयना धरण शंभर टक्के भरल्याने पाणी बामणोली गावाला लागले आहे. 000

Share this story