गाव कारभाऱ्यांच्या मदतीने झाडांचा महाराष्ट्र निर्माण करणार सिने अभिनेते सयाजी शिंदे

sayaji-shinde

वडूज : सह्याद्री देवराई   सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड संदर्भात सरपंच कार्यशाळा खासदार श्रीनिवास पाटील सभागृहात आयोजित केली होती त्यावेळी सयाजी शिंदे यांनी प्रत्येक गावात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन सर्व गावकारभारी सरपंच यांना केले तसेच झाडांचे महत्त्व पटवून देऊन झाडांची निर्मिती करून राज्याला ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा ध्यास प्रत्येक गावच्या सरपंचानी घ्यावा तरच कोरोना सारख्या भयंकर आजाराचा आपण मुकाबला करू शकतो.

प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी शिंदे साहेबांनी केलेल्या आवाहनाला सर्व सरपंच यांनी मदत करून आपले झाडांचे  गाव निर्माण करावे तसेच दीपस्तंभ संस्थेच्या वतीने अमेय जोशी यांनी सरपंच यांना csr फंडच्या बाबतीत माहिती दिली प्रस्ताव देणेबाबत सूचित केले यावेळी शंकरराव खापे बापू, मंदाकिनी सावंतसंतोष शेळकेजयंत जाधवअभय फडतरेसतीश इंगवले, सुरेखा डुबलअजित मानेविक्रम जाधवफत्तेसिंह जाधवसचिन मानेसूरज कीर्तिकरविष्णू गायकवाड, संपत देशमुख, अविनाश पाटीलसंतोष शेडगे, जावेद मुल्लाअशोक झिम्बारेज्ञानेश्वर शिंदेसुचेता मोहोतेविद्या घबाडेसंगीता चव्हाणसुनीता मगर इत्यादी गावोगावचे सरपंच उपस्थित होते. 000

Share this story