देवापुर येथे ई- पीक प्रशिक्षण संपन्न

devapur-e-pik

म्हसवड : राज्य शासनाच्या -पीक पाहणी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सर्व शेतकरी नागरिक यांना माहिती व्हावी त्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग व्हावा, यासाठी माण तालुक्यातील देवापूर येथील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित केले होते याला शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, म्हसवड चे मंडल अधिकारी जाविर, देवापूर तलाठी माधुरी चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, सरपंच शहाजी बाबर, बाबासाहेब बनसोडे, अशोक बनसोडे, सागर बाबर, हर्षल बाबर, अरुण सावंत, अमोल बनसोडे यांच्यासह , ग्रामपंचायत सदस्य  शेतकरी हजर होते. ग्रामपंचायत भवन येथे  -पीक पाहणी या प्रकल्पाबाबत मा. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी उपस्थिताना माहिती दिली. त्यांना ॲपच्या माध्यमातून पीकपाहणी करण्याबाबत प्रात्यक्षिक दिले.

. उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की- -पीक पाहणी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये संबंधित शेतकरी हे मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्यांच्या शेतातील पिकांची पीक पाहणी करून त्यांच्या सात-बारावर नोंद करू शकणार आहेत. यामुळे भविष्यात त्यांना पीक कर्ज मिळणे तसेच, सात-बारावर पिकांची अचूक नोंद होणे, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे, हे सोपे होणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव. खातेदार यांनी त्यांची पीक पाहणी -पीकपाहणी ॲपच्या माध्यमातून करावी., असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच गावातील विकास कामा संदर्भात नागरिकांशी चर्चा करून पाहणी केली. ग्रामपंचायत राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

रेशन दुकानावर कारवाई 

प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी पीक पाहणी दरम्यान देवापूर ला आले असता त्यांना रेशन विभागाची दफ्तर तपासणी करायची असल्याने संबंधित दुकानदारांना फोन द्वारे संपर्क करण्यात आला होता, मात्र ते सदर ठिकाणी उपस्थित नसल्याने दुकाने सील करण्याचे संबंधित तलाठी यांना आदेश दिले.

Share this story