शेणोली येथे उद्योजकता विकास जनजागृती शिबीर

shenoli-vikas-janjagruti

कराड : मी नागरिक फौंडेशन कराड आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्ट सातारा यांच्यावतीने शेणोली ता. कराड येथे नवउद्योजक, युवक, बचत गटातील महिला यांचा उद्योजकता विकास जनजागृती शिबीर उत्साहात संपन्न झाले.

यावेळी प्राचार्य जयंतराव पाटील, भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे विठ्ठल तिकांडे, श्रीकांत कुंभार यांनी मार्गदर्शन केले.

शेणोली गावातील नवउद्योजकांना महिला, बचत गटातील महिलांना, ज्यांनी नव्याने उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे, त्या नवउद्योजकांना नवीन व्यवसाय कसा निवडावा,  बँक लोनसाठी कशाप्रकारे तयारी करावी, व्यवसायासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, ट्रस्टच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे व्यवसाय वाढवू शकता, त्याच बरोबर  ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून कशा प्रकारे विविध उपक्रम राबवले जातात अशा विविध बाबींची माहिती या शिबिरात देण्यात आली.

यावेळी सरपंच विक्रम कणसे, ग्रामपंचायत सदस्य संतोष कणसे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अंकुश कणसे, महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज संघटनेचे संचालक उद्योजक विकास भरते, सावली ग्रामसंघाच्या अध्यक्ष सुनंदा कणसे, सीआरपी सोनाली साळुंखे, भाग्यश्री कणसे, पूजा वाघमारे, यल्लाप्पा कोर्ते, वैभव मदने, मिलिंद साळुंखे, अरुण म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नवउद्योजक, तरुण, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. 000

Share this story