मांढरदेव घाटासह वेरुळी, सोमेश्वरवाडी परिसरात बिबट्याचा वावर

mandhardev-bibtya
बिबट्याच्या दर्शनाने नागरिक व भाविकांच्यात भीतीचे वातावरण

ओझर्डे/समीर मेंगळे : मांढरदेव घाट परिसरासह माळवटार, वेरुळी व सोमेश्वरवाडी या परिसरात काल दिनांक १२ रोजी ५:३० वाजण्याचा दरम्यान बिबट्याचा डोंगर कड्यावर घनदाट झाडी असल्याने मुक्त संचार दिसून आल्याने मांढरदेव गावातील काही तरुणांनी पाहिले. या तरुणांची या बिबट्याचा व्ही.डी.ओ. तयार करून अनेक ग्रुपवर व्हायरल केला आहे. हा बिबट्या रात्री ८ वाजणेच्या सुमारास वेरुळी (सोमेश्वर) येथे फिरत असताना आढळून आला. घाटालगतच्या व दुर्गम सर्वच गावामध्ये गुराखी आपापली जनावरे चारण्यासाठी या परिसरात जात असतात. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

mandhardev-bibtya2

गेल्या १५ दिवसापासून मांढरदेव डोंगर रांगामध्ये व धावडी, वेळे येथील सोळशी घाट या परिसरामध्ये यावर्षी वेळोवेळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे झाडाझुडपांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने वन्य प्राण्यांचा या वाढलेल्या झाडीचा आधार घेऊन बिबट्याने आपला मुक्त संचार चालू ठेवून नाग्रीकांच्यात दहशत निर्माण केली आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्ट येथील परिसरात १० दिवसापूर्वी याच बिबट्याचा वावर आढळून आला होता. तेथील कुत्र्याची लहान पिले या बिबट्याने फस्त केली होती. मांढरदेव पाठीमागे पालान नावाच्या गावातसुद्धा या बिबट्याचा वावर आढळून आला होता. त्यामुळे शेतामध्ये काम करणा-या महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त न होताच बालेघरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लांडग्यांचा कळप फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यांनी तेथील शेळ्यांच्यावर झडप घालून ठार केल्याचे शेतकरी सांगत आहेत. बिबट्याने मांढरदेव येथील शेळ्या फस्त केल्या आहेत. त्यातून त्यांची भूक भागली असून  गेल्या १५ दिवसापासून या बिबट्याचा धुमाकूळ होत असताना देखील याबाबत वाई शहरातील वन विभागाला कळवूनदेखील वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची फक्त पाहणीच करून आले . वास्तविक पाहता वनविभागाने जीवितहानी होण्याची वाट न पहाता बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे असताना देखील या मुख्य विषयाकडे गांभीर्याने न पहाता वनविभागाने आपली जबाबदारी टाळल्याचे जाणवत आहे. अनेक ठिकाणी यापूर्वी वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी वनविभागाची तत्काळ कारवाई होत होती परंतु दुर्दैवाने बिबट्याबाबत वाई वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने डोंगर पायथ्याच्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून तरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने बंदोबस्त करण्याची मागणीहि नागरिकांनी केली आहे. 000

Share this story