कातरखटाव येथे बेदाण्याचा ट्रक पलटी

katarkhatav-bedana-truck
एक गंभीर तर एक किरकोळ जखमी : ठेकेदाराने साईडपट्ट्या न भरल्याने अपघात ग्रामस्थांचा आरोप

वडूज : कातरखटाव (ता. खटाव) येथे दि 15 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सांगलीहुन गाझीयाबाद येथे बेदाणा घेवून निघालेला ट्रक रस्त्याच्या साइड पट्ट्या न भरल्याने पलटी झाल्याने दोघेजण जखमी झाले असून यातील एक जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या बाबत सविस्तर माहीती अशी की, मिरज-भिगवण हा राज्य मार्ग कातरखटाव गावातून जातो. या मार्गाचे मनमाड-बेळगाव या राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर झाले आहे. या मार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतुक सुरु असते. रस्त्याचे गेल्या दोन महिन्यापुर्वीच नुतनीकरण झाले आहे. ठेकेदाराने रस्त्याच्या कडेच्या साईडपटटया ही भरलेल्या नाहीत. या बाबत वर्तमानपत्रातून आवजही उठविला होता. आज सकाळी 9 वाजता बेदाण्याने भरलेला ट्रक ( क्र. RJ 11 GB 4146 ) सांगलीहुन गाझीयाबादकडे निघाला होता. हा ट्रक विजयराज हॉटेलच्या समोर आला असताना समोरून येणा-या दुस-या ट्रकला साईड देत असताना चाके रस्त्यावरुन खाली उतरली. रस्त्याची साईडपटटी खोल असल्याने चालकाचा ताबा सुटला. दुध घालण्यासाठी निघालेल्या कातरखटावच्या सतिश जंगम (वय 47) या युवकास ताबा सुटलेल्या ट्रकने धडक दिली व पुढे शंभर मीटरवर जावून हा ट्रक पलटी झाला. मोठा आवाज झाल्याने आजुबाजूचे लोक गोळा झाले व ट्रकमध्ये असणा-या दोघांना बाहेर काढले. यामध्ये ट्रकचा क्लिनर ब्रिजेश पाल (वय 27) हा किरकोळ जखमी झाला. तर सतीश जंगम यांच्या डोक्यास जोरात धडक दिल्याने ते बेशुदृध होउन गंभीर झाले आहेत. ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमधील बेदाण्याची बॉक्स अस्ताव्यस्त पडलेली आहेत. लोक मात्र बेदाणे पळपिण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा - रत्नाकर बोडके, संचालक कात्रेश्वर पेट्रोलियम कातरखटाव.

ठेकेदाराने रस्त्याच्या साईपटटया न भरल्यामुळे हा अपघात झाला आहे. या दोन महिन्यात आठ अपघात झाले आहेत. यामध्ये बऱ्याचजणांना जायबंदी व्हावे लागले आहे. प्रशासन लोकांच्या मृत्युची वाट बघतंय का? डोळेझाक केलेल्या प्रशासनाला लोकांचे जीव गेल्यानंतर जाग येणार का? संबंधीत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याचा बांधकाम ठेका रदद करण्यात यावा. 000

Share this story