तलाठी व मंडलाधिकारी यांच्याबद्दल अपमानास्पद केलेल्या  वक्तव्याचा निषेर्धात कामबंद आंदोलन

khandala-nivedan

खंडाळा : ई महाभूमी राज्य प्रकल्प समन्वयक अधीकारी यांनी तलाठी संघाच्या राज्य अध्यक्ष यांना तलाठी व मंडलाधिकारी यांच्याबद्दल अपमानास्पद केलेल्या  वक्तव्याचा निषेर्धात खंडाळा तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्याकडे  डीएससी (डिजीटल सह्याचे मशीन) जमा करून 13 ऑक्टोंबर पासून काम बंद आंदोलन केले असल्याची घोषणा केली.

माञ  निवडणूक व नैसर्गिक आपत्तीवेळी काम करणार असल्याचे तलाठी संघटनेकडुन यावेळी सांगण्यात आले.यावेळी तलाठी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य ज्योतिबा दगडे, सचिव सी.टी. जाधव,मंडलाधिकारी नाबर, तलाठी पी.डी.किरवे,निवृत्ती खेताडे,सागर शिंदे,एन.डी. जोशी,सौ.आरती दळवी व सौ.मनिषा जाधव उपस्थित होते.

ई राज्य भूमी राज्य प्रकल्प अधिकाऱ्यांनी तलाठी आणि मंडलाअधिकारी यांच्या बद्दल अपशब्द व संस्कृत भाषा वापरत अपमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून डीएससी सुपूर्द करून बुधवारपासून आंदोलन सुरू असल्याचे तालूका संघाकडुन सांगण्यात आले परंतु निवडणूक नैसर्गिक आपत्ती वेळी काम करणार असल्याचे तलाठी संघाने यावेळी स्पष्ट केले.यामुळे सध्या कारखाना निवडणुक कामावर या आंदोलनाचा परिणाम होणार नाही.तसेच सातबारा व अन्य कामासाठी नागारिकांची होणाऱ्या गैरसोयीबाबत या संघटनेकडुन दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. 000

Share this story