'तो' दुर्दैवी अपघात वैमानिकाच्या चुकीने 

General Bipin Rawat

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था  

ढगाळ वातावरणात वैमानिकाच्या चुकीमुळे भारतीय तिन्ही सैन्यदलांचे पहिले प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले, असा निष्कर्ष 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'ने 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर' आणि 'कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर'चे विश्लेषण करून 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'ने हा निष्कर्ष काढला आहे. 

'सीएफआयटी' परिस्थिती उद्भवते तेव्हा एखादे विमान वैमानिकाच्या पूर्ण नियंत्रणात असतानाही अनवधानाने जमिनीवर किंवा पाण्यात कोसळते. जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात अशाच प्रकारचा होता, असे लष्करी न्यायालयाच्या चौकशी समितीने प्राथमिक चौकशीनंतर निदर्शनास आणले आहे. 

तामिळनाडूतील कोईम्बतूरच्या सुलूर हवाई तळावरून मागील वर्षी ८ डिसेंबर रोजी वेलिंग्टनमधील संरक्षण कर्मचारी सेवा महाविद्यालयाकडे निघालेले 'एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. या अपघातात सीडीएस जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य ११ लष्करी अधिकारी यांचा मृत्यू झाला.

 या अपघाताची चौकशी भारतातील सर्वात अनुभवी हेलिकॉप्टर वैमानिक एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'ने आपले प्राथमिक निष्कर्ष सादर केले आहेत. कोर्ट ऑफ इन्क्वायरीने यांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण ठरवले. "त्याच्या निष्कर्षांवर आधारित, कोर्ट ऑफ इन्क्वायरीने काही शिफारसी केल्या आहेत ज्यांचे पुनरावलोकन केले जात आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Share this story