सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी आयकर विभागाची तपासणी 

sonu sood

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

कोरोना काळात विस्थापितांना सर्व प्रकारची मदत केल्याने चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूद याच्याशी संबंधित असलेल्या मुंबई आणि लखनौ येथील ६ ठिकाणी जाऊन आयकर विभागाच्या पथकांनी कागदपत्र आणि नोंदणीची पाहणी केली. दिल्ली राज्य सरकारच्या शालेय योजनेचा ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करण्याबाबत सोनू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर ही कार्यवाही झाल्याने या कारवाईचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. 

दिल्ली सरकारने शालेय शिक्षण विभागात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पालकत्व योजना (मेंटॉरशिप प्रोग्रॅम) राबविण्यात येणार आहे. या योजनेचा ब्रँड अँबेसेडर म्हणून सोनूने काम करावे, या उद्देशाने केजरीवाल यांनी त्याची भेट घेतली होती. त्यानंतर त्याला राजकारण प्रवेशाबाबत प्रश्न विचारले असता त्याने काहीही बोलण्या नकार दिला. मात्र, या भेटीपासून सोनू आम आदमी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

ही कारवाई सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली केली गेली असल्याचा इन्कार भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असिफ भामला यांनी केला. आयकर विभाग हा स्वायत्त आहे. त्यांची कार्यपद्धती आणि कार्यकक्षा ठरलेली आहे. सोनूशी संबंधित ठिकाणी धाडी घालण्यात आलेल्या नाहीत तर तपासणी करण्यात आलेली आहे, असे स्पष्ट करतानाच सामाजैक काम करणारे चुका करीत नाहीत, असे नाही. त्यांच्या परोक्ष- अपरोक्ष खालच्या पातळीवर काही घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.    

Share this story