'तालिबानची नको; शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करा' 

Mehabooba Mufti

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

तालिबानची राजवट आणि अफगाणिस्तानच्या लोकांची काळजी करण्यापेक्षा मोदी सरकारने देशातील नागरिकांना येणाऱ्या समस्यांची; विशेषतः शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घ्यावी, अशा कानपिचक्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिल्या. 

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशातील नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे. शेतकरी मागील नऊ महिन्यांपासून उन्हा- पावसात रस्त्यांवर ठाण मांडून बसले आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे सुर्लक्षंच करीत आहे, अशी टीका मेहबूबा यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

तालिबान तिकडे अफगाणिस्तानात आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याकडे जास्त चर्चा का करायची? आपल्याकडे चिंता करण्यासारखे अनेक मुद्दे आहेत. सर्वात मोठा मुद्दा शेतकरी आंदोलनाचा आहे. जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनाचा मुद्दा आहे. सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सर्व क्षेत्रातील विकासाचा अभाव याबद्दल चर्चा करा, असे त्यांनी मोदी सरकारला सुनावले.  

Share this story