होता अभी म्हणुन मिळाला मृत्युवरही जीत डॉक्टर पिता पुत्र ठरले देवदुत

hota-abhi

म्हसवड/महेश कांबळे : असे म्हणतात की दैव बलवत्तर असेल तर कोणत्याही संकटातुन मुक्तता होते, असे असले तरी येथे मात्र दैव बलवत्तर तर होतेच पण देवदुतासारखे डॉक्टर व यमालाही माघारी परतावयास लावणारा मित्र ही सोबत असल्यानेच मृत्युच्या दाडेतुन युवक बाहेर आला असल्याची घटना म्हसवड शहरात घडली असुन सध्या या घटनेमुळे डॉक्टर पिता पुत्राचे‌ व पोलीसदादाचे शहरवासियातुन कौतुक होत आहे.

त्याचे झाले असे की म्हसवड नजीक असलेल्या काळचौंडी येथील धनाजी माने या युवा शेतकऱ्याला गत अठवड्यात आपल्या शेतात काम करीत असताना भर दुपारी अतीविषारी अशा घोणस सर्पाने दंश केला, आपल्याला दंश केलेला सर्प हा अतिविषारी घोणस‌च असल्याची खात्री शेतकरी असलेल्या धनाजी माने-पाटील यांना पटल्याने त्यांनी घाबरुन न जाता याची माहिती आपल्या मोबाईलवरुन म्हसवड येथील आपले मित्र पोलीसदादा अभिजीत भादुले यांना देत सर्व परिस्थिती त्यांना सांगितली, भादुले यांनाही घोणस या अतिविषारी सापाबद्दलची चांगलीच माहिती असल्याने त्यांनी फोनवरच धनाजी यास धिर‌ देत घाबरुन न जाण्याचा सल्ला देत तात्काळ म्हसवड येथे येण्याचे सांगितले तर धनाजीवर झालेल्या सर्प हल्ल्याचे गांभीर्य ओळखत भादुले यांनी याची माहिती म्हसवडचे सुप्रसिद्ध डॉ. चेतन गलंडे व त्यांचे वडिल जयवंत गलंडे यांना देत सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यास सांगितले. जोवर धनाजी माने हे म्हसवडला पोहचत नाही तोवर त्याच्याशी सतत बोलत त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम एकीकडे सुरु ठेवत भादुले यांनी दुसर्या फोनवरुन डॉक्टरांशीही चर्चा सुरु ठेवली अगदी १५ मिनिटांत धनाजी ला घेवुन गाडी म्हसवड येथील गलंडे हॉस्पिटल येथे येताच घटनेचे गांभिर्य ओळखुन वेळ न दवडता डॉ. चेतन गलंडे व जयवंत गलंडे या पिता पुत्रांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले, नेहमीच रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानत आलेल्या गलंडे पितापुत्रांच्या प्रामाणिक प्रयत्नाला अखेर यश आले अन धनाजीवरील धोका टळला, धनाजीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले असले तरी रुग्णालयात धनाजीला डॉक्टरांच्या देखरेखेखाली १० दिवस रहावे लागणार होते या काळात वर्दीतील दर्दी अशी पोलीस दलात ओळख असलेले त्याचे‌ मित्र अभिजीत भादुले हे दररोज आपल्या दैनंदिन कामातुन वेळ काढुन धनाजीला भेटुन त्याच्यासोबत चर्चा करीत त्याच्यातील उमेदीला चालना देण्याचे काम करीत होते. १० दिवस व्यवस्थित औषधोपचार घेतल्यानंतर धनाजी माने यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले, मात्र एवढ्या मोठ्या प्राणघातक संकटातुन ज्यांनी ‌आपल्याला वाचवल त्या सर्वांचे मनापासुन कधी एकदा जाहीर आभार मानतोय हा विचार धनाजीलाही स्वस्थ बसुन देत नव्हता आज आपण जे आहोत ते केवळ आपले मित्र अभिजीत भादुले व डॉक्टर गलंडे यांच्यामुळेच हे डॉक्टर नाहीत तर ते देवदुत आहेत हे सर्वांना समजावे यासाठी धनाजी माने यांनी आपल्या कुटुंबियासोबत व मित्रांसोबत म्हसवड येथे येत डॉक्टर गलंडे यांच्या रुग्णालयातील सर्व रुग्ण व कर्मचार्यांच्या उपस्थितीत डॉक्टर पिता, पुत्राचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देवुन सन्मान करीत कुटुंबासह सर्वांचे आभार मानले, यावेळी उपस्थितांच्या तोंडुन आपसुकच होता अभी म्हणुन मिळवता आली मृत्यु वर ही जीत असे शब्द आपसुकच बाहेर पडले, तर डॉक्टर तुम्ही देव आहात अशा भावना माने कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी सतीश जगताप, गणेश काटकर, स्वप्नील माने, अभिजित भादुले, डॉ. गायकवाड, सूरज तुपे, सचिन  पुकळे, सोमनाथ यादव,विशाल जाधव, निलेश सावंत, पत्रकार एल.के. सरतापे उपस्थित होते.

म्हसवड शहरात डॉ. गलंडे यांच्या रुग्णालयात कोरोना काळात ही शेकडो रुग्णांना जिवदान देण्याचे काम झाले असुन रुग्णसेवेचे घेतलेले व्रत अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी व रुग्णसेवेला ईश्वरीय सेवा मानणार्या डॉक्टर गलंडे यांच्या सेवाभावी कार्याला सामान्य रुग्णांकडुन आशीर्वाद दिले‌ जात आहेत.

अभिजीत भादुले हा वर्दीतील खरा दर्दी

म्हसवड पोलीस दलात गोपनीय विभागात कार्यरत असलेले अभिजीत भादुले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका तरुणाचा जिव वाचवण्यात डॉक्टरांनाही यश आले आहे त्यामुळे सामान्यांच्या ‌मनात पोलीसांची प्रतिमा अधिक उंचावली असुन वर्दीतही दर्दी माणसाचे दर्शन घडल्याच्या प्रतिक्रिया या निमित्त उमटत आहेत. 000

Share this story