असदुद्दीन ओवेसी हे बेलगाम सांड: राकेश टिकैत

Asaduddin Owaisie

हैदराबाद/ प्रतिनिधी 

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी हे बेलगाम सांड असून भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचे त्यांचे छुपे धोरण आहे, असा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. ओवेसी यांना हैदराबाद आणि तेलंगणाच्या बाहेर जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

एमआयएमचा प्रभाव असलेल्या हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये टिकैत यांनी नाव न घेता ओवेसी यांच्यावर टीकेची झोड उठवली. ओवेसी यांना हैदराबादेत बांधून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोणताही लागा नसलेला आणि आगापीछाही नसलेला सांड तुम्ही गावाला सोडला आहे. तो भाजपाची मदत करत फिरत असतो. देशभरात भाजपाला सर्वाधिक मदत त्याच्याकडूनच मिळत आहे. तो बोलतो एक आणि करतो वेगळेच. त्याचे उद्दीष्ट वेगळेच आहे. सगळ्या देशाला हे माहिती आहे की तो जिथे जाईल तिथे भाजपाला मदत करेल. त्यामुळे त्याला इथेच बांधून ठेवा. इथून बाहेर भटकू देऊ नका, असे टिकैत या मेळाव्यात बोलताना म्हणाले.      
 

Share this story