क्षमता व कर्तृत्व असलेल्या व्यक्तीच्या‌ हाती‌ सत्ता‌ द्या‌ - अनिल देसाई

anil-desai-satkar1

म्हसवड : माझ्यातील क्षमता कै. अभयसिंह राजेभोसले, श्रीमंत रामराजे ‌व श्रीमंत आ. शिवेंद्रसिंह राजेभोसले  यांनी पाहिली असल्यानेच त्यांनी ‌आजवर माझी पाटराखण करीत मला एकदा नव्हे तर चारदा जिल्हा बँकेत संचालक म्हणुन निवडुन आणले त्यापैकी दोनवेळा मी बिनविरोध निवडुण आलो आहे, माझ्यातील नेतृत्व व कर्तृत्वच यासाठी कामी आले आहे, म्हसवड नगरपरिषेची सत्ता ही ज्यांच्या‌ अंगी नेतृत्व व कर्तृत्व आहे अशाच व्यक्तीच्या हाती द्या आजवर म्हसवडकरांनी दोनवेळा शहराबाहेरील व्यक्तींच्या हाती सत्ता देवुन पाहिले आहे‌अन दोन्ही वेळा त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे यापुढे म्हसवडकरांची फसगत हेवु नये यासाठी म्हसवडकरांनी नेतृत्व व कर्तृत्व असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी ठाम रहावे असे‌ आवाहन जिल्हा बँकेचे नव निर्वाचित संचालक अनिल देसाई यांनी बोलताना केले.

anil-desai-satkar

सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक म्हणुन निवडुन आल्याबद्दल देसाई यांचा ‌म्हसवड येथील मासाळवाडी येथे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी म्हसवडचे राजे पृथ्वीराज राजेमाने, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, वरकुटे-मलवडीचे सरपंच बाळासाहेब जगताप,जालिंदर खरात, बनगरवाडीचे माजी सरपंच भारत अनुसे, दिलीपशेठ विरकर, तुळशीराम गोरड, मधूकर विरकर ,दुर्योधन लोखंडे, पळशीचे सरपंच देवकुळे, उपसरपंच शंकर गंबरे, सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत जगदाळे, जयसिंग नरळे, गणेश माने, सचिन लोखंडे, राजू गोरड, बंटी माने,सचिन माने,सदाशिव बनगर, नितीन मगर, रमेश गायकवाड उपस्थित होते.

 पुढे बोलताना देसाई म्हणाले की नेहमीच माझ्यावर प्रेम करणाऱ्या मानाचा फेटा व मायेची शाल देणाऱ्या मासाळवाडीकरांच्या ऋणात मी कायम राहीन. सातारा जिल्हा बॅंकेत माझ्यारुपाने दुसरे संचालक पद मिळाले. आज बँकेत माणच्या माणसाचा सन्मान होतो. या गावाच्या विकासासाठी, तरुणांसाठी तालीम बांधून देईन. पाणी वापर संस्था तयार करा जिल्हा बँकेच्या माध्यमातून गावासाठी पाणीपुरवठा योजना तयार करुन देईन. माझ्यासोबत येणाऱ्या युवकांना मी कधीच व्यसनाकडे जावून दिले नाही उलटपक्षी त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यामुळेच माझ्याबरोबर आलेले तरुण चारचाकीतून फिरत आहेत. म्हसवड शहराची अवस्था पाहून मन अस्वस्थ होतं. म्हसवड शहर स्वच्छ, सुंदर व्हावं, आदर्श शहर व्हावं असं आम्हाला नेहमी वाटतं. त्यामुळे चांगल्या विचारांची माणसं एकत्र येवू व म्हसवड शहराचा चेहरामोहरा बदलूया.

पृथ्वीराज राजेमाने म्हणाले अनिल देसाई यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड ही माणसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. चेअरमन पदी त्यांना संधी मिळावी ही आमची मनापासून इच्छा आहे. आपण आपल्या माणसांचा सन्मान करणं महत्वाचं असतं अन आज आपण सर्वजण करत आहोत हे महत्वाचे आहे.

जालिंदर खरात म्हणाले जातीभेद विसरुन राजकारण करणारे युवकांचे आयडाॅल म्हणून अनिल देसाई यांचा उल्लेख केला जातो याचा‌ आम्हाला सार्थ‌ अभिमान वाटतो.

भारत अनुसे म्हणाले, भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा व सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून जावून विक्रम केला आहे.

आनंदा मासाळ म्हणाले अनिल देसाई हे पर्मनंट संचालक व्हावेत तसेच माणचे आमदार म्हणून गावात यावेत.

यावेळी मासाळवाडीचे सुपुत्र पै.अक्षय मासाळ याचा सत्तर किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,रामभाऊ मासाळ, शहाजी मासाळ,महादेव मासाळ ,अविनाश मासाळ,आनंदा मासाळ, बाळासाहेब मासाळ,आप्पा मासाळ,लिंगाप्पा मासाळ, ज्ञानदेव मासाळ,भारत मासाळ,अजिनाथ मासाळ ,व मासाळवाडीतील युवक यांनी प्रयत्न केले.

सचिन मासाळ यांनी प्रास्ताविक केले. राहुल पाठक याने सुत्रसंचालन केले तर आभार मानले. 000

Share this story