मी लोळत जाईन .... नाहीतर रांगत जाईन

udayanraje14
खासदार उदयनराजे भोसले यांचे शिवेंद्रसिंहराजे यांना हटके उत्तर

सातारा : साताऱ्यात कुठे कसे जायचे हे माझे मी ठरवेल. विकास कामांच्या उद्घाटनासाठी मी लोळत जाईल .... गडगडत जाईल ..... अथवा दंडवत घालत जाईल याचे तुम्हाला काय करायचे आहे? असे जोरदार प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे

प्रतापगड येथील भवानी देवीच्या दर्शनाला खासदार उदयनराजे आले होते. त्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या गाडी चालवण्यापेक्षा पालिका व्यवस्थित चालवली असती तर बरे झाले असते, यांची कामे म्हणजे नौटंकी असे आरोप केले होते त्या आरोपांना उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीत जोरदार उत्तर दिले.

उदयनराजे पुढे म्हणाले, मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो, मी चालत ही जाईन, रांगत ही जाईन, वाटले तर लोळत ही जाईन नाहीतर लोटांगण घालत ही जाईन. एवढेच काय गडगडत ही जाईल, सीट वर उभा राहून जाईल नाहीतर डोक्यावर चालत जाईन, तुम्हाला काय करायचेय? अशा भाषेत उत्तर दिल्याने राजेंमधील नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका उडवला आहे. यावर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टर बाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे. 000

Share this story