घराणेशाहीवरून पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

India to continue growing at fastest pace; could be second-largest economy by 2030: PM

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याकडून घराण्यासाठी एखादा पक्ष चालवला जात असेल तर ती बाब भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तब्बल १४ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमाच्या वेळेतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आगामी हिवाळी अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली. 

भारतीयराजकारणातील घराणेशाही हा लोकशाही मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही भागातील घराणेशाहीची चालणारे पक्ष पहिले तर लोकशाहीसाठी ते घटक असल्याचे दिसून येईल; अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी राजकारणातील; विशेषतः काँग्रेसमधील घराणेशाहीवर टीका केली. घराणेशाहीची चालणारे पक्ष हा संविधानाचे संरक्षण करू इच्छिणाऱ्यांसाठी काळजीचा विषय बनला आहे. घराणेशाहीमुळे भारतातील परिस्थिती बिकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

राजकीय घराण्यातील नव्या पिढीतील एखाद्या व्यक्तीने राजकारणात येण्यास काहीच हरकत नाही. मात्र, गुणवत्तेने, लोकांच्या प्रेमाने, आशीर्वादाने राजकारणातील आपले स्थान निर्माण करणे, टिकवून ठेवणे गरजेचे आहे. पिढ्यानपिढ्या एखादा पक्ष एखादे घराणेच चालवत राहिला तर ते लोकशाहीसाठी घातक आहे, अशा शब्दात मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्याला लक्ष्य केले. 

सन २०१५ मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा करण्यात आला तेव्हाही विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला. वास्तविक हा दिवस जगातील सर्वात मोठी घटना आणि त्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे तरीही विरोधकांना त्यावर बहिष्कार घालण्याचे कारण काय; असा सवालही मोदी यांनी केला.     

Share this story