राज्यातील आघाडी सरकार हे उत्तम काम करीत आहे -  खा शरद पवार

mahabaleshwar-sharad-pawar

महाबळेश्वर : राज्यातील आघाडी सरकार हे उत्तम काम करीत आहे कोणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षाचा कायर्काल पूर्ण  करणार भविष्यात जर आम्ही पुन्हा एकत्र निवडणुका लढण्याचा निणर्य जर घेतला तर पुढील पाच वर्ष देखिल राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील असा विश्वास राष्ट्वादी काॅग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी महाबळेश्वर येथे पत्रकार परीषदेत बोलताना व्यक्त केला.

महाबळेश्वर येथे युवक राष्ट्वादी काॅग्रेसचे दोन दिवसीच प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबीराच्या समारोपासाठी खा. शरद पवार हे महाबळेश्वर येथे आले होते. शिबीराला जाण्यापूर्वी त्यांनी येथील शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांचे सोबत गृहराज्य मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील व आ. मकरंद पाटील हे उपस्थित होते माजी मंत्री चंद्रकांत पाटील हे पंधरा दिवसात हे आघाडी सरकार पडणार अशी भविष्यवाणी करीत आहे. त्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना खा. शरदपवार हे बोलत होते ते म्हणाले की पाटील यांना आता काही काम उरले नाही त्यामुळे त्यांनी आता नविन भाकित व्यक्त करण्याचा नविन व्यवसाय सुरू केला असावा अशा शब्दात पाटील यांची खा. शरद पवार यांनी खील्ली उडविली. सातारा जिल्हा बॅकेची झालेली निवडणुकीत शिवसेनेला विश्वास न घेतल्याने शिवसेनेचे ना. शंभुराज देसाई हे पराभुत झाले आता पुढील काळात ते स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे याबाबत बोलताना खा. पवार म्हणाले की जिल्हा बॅकेची निवणुक ही आघाडी करून लढविली नाही सर्व उमेदवार हे स्वतंत्र उभे राहीले होते तर काही उमेदवार हे सहकार पॅनेलच्या वतीने निवणुक लढवित होते ही लोकशाही आहे प्रत्येकाला स्वायत्ता आहे त्यामुळे आलेला निकालही त्यांनी स्विकारला पाहीजे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या बाबत बोलताना खा. पवार म्हणाले की शशिकांत शिंदे यांनी ही निवणुक गांभियार्ने घ्यायला हवी होती नवनिवार्चित बॅकेतील संचालकांनी आता भविष्यात राजकारणाचे जोडे बाहेर काढुन बॅकेचा कारभार राजकारण विरहीत केला पाहीजे असेही ते म्हणाले.

महाबळेश्वर येथे शिबीराची जुनी परंपरा आहे 52 वर्षपूर्वी येथे झालेल्या शिबीरात माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळी स्व यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक ही मंडळी आम्हाला प्रशिक्षण देत असत अशी आठवण सांगुन खा. शरद पवार म्हणाले की राज्यात आघाडी सरकार आहे आघाडी सरकार कसे चालते राज्याची संस्कती जडण घडण तसेच देशा समोर असलेले प्रश्न राज्या समोर असलेले प्रश्न हे नविन पिढीला समजले पाहीजे म्हणुन पक्षाच्या वतीने हे युवकांना प्रशिक्षण देणारे शिबीर घेण्यात आले आहे. राज्य सरकारमधील नव्या पिढीचे विचार पक्षातील तरूणांना ऐकायला मिळावे त्यांना प्रश्न विचारण्याची संधी तरूणांना मिळावी हाच या शिबीरा मागील प्रमुख उद्द्ेश असल्याचे ही खा शरद पवार यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले़. भविष्यात तरूणांना निवडणुकीत अधिक संधी मिळावी अशी तरूणांकडुन मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना खा. शरद पवार म्हणाले की पक्षात काम करणारे तरूणांच्या पक्षाकडुन खुप अपेक्षा आहे आणि त्या चुकीच्या नाही याबाबत पक्षातील कोअर कमेटी एकत्र बसुन या बाबत धोरण ठरविले जाईल राज्यात आघाडी सरकार आहे भविष्यातील निवणुका या एकत्र लढायच्या की स्वळावर या बाबत देखिल देखिल पक्षाचे धोरण लवकरच निश्चित केले जाईल.

राज्य परीवहन मंडळाची आथिर्क स्थिती बिकट आहे 1948 साली राज्यातील पहीली एस.टी. रस्त्यावर धावली तेव्हापासुन कमर्चारी यांचे पगार देण्यासाठी कधी अॅडव्हान्स घेण्याची वेळी महामंडळावर आली नाही गेली दोन वषार्त कोरोनामुळे महामंडळाची आथिर्क घडी विस्कटली त्यामुळे कमर्चारी यांचे पगारासाठी पाचशे कोटी रूपयांचा राज्य सरकार कडुन अॅडव्हान्स घेण्याची वेळ या महामंडळावर आली. एस.टी. हे सवर्सामान्यांच्या दळण वळणाचे महत्वाचे साधन आहे आता या कमर्चारी वर्गाने विलीगीकरणाची मागणी केली आहे. या मागणीजर मान्य केली तर राज्य शासनावर मोठा आथिर्क भार पडणार आहे याचा विचार राज्य शासनाने केला पाहीजे महामंडळाचे कमर्चारी हे राज्य शासनाचे कमर्चारी नाहीत नोकरीसाठी अर्ज करताना त्यांनी राज्य शासनाकडे अर्ज केला नाही परीवहन महामंडळा प्रमाणे आता राज्यातील अंगणवाडी सेविकांनी देखिल मागणी केली आहे अशा राज्यात पंधरा संस्था आहेत त्या संस्था देखिल अशीच मागणी करतील याबाबत देखिल विचार झाला पाहीजे एस.टी.मध्ये आता कोणती संघटना अधिकृत आहे याचा निणर्य झाला पाहीजे त्यामुळे जर विलीगीकरणाचा करार कोणा बरोबर करायचा हे देखिल अदयाप स्पष्ट झाले नाही या कमर्चारी यांच्या आंदोलनामुळे विरोधकांना देखिल हे प्रकरण पेटविण्याची आयती संधी मिळाली आहे असे ही खा शरद पवार यांनी स्पष्ट केले. 000

Share this story