एस.टी.महामंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकणार

mahabaleshwar-st-stand
सभापती संजय गायकवाड यांचा इशारा

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम भागातील ८५ हुन अधिक गावे दिड महिने संपर्कहीन होती आता रस्ते होऊन देखील एस टी महामंडळाच्या आडमुठेपणामुळे एस टी सेवा दुर्गम भागात अद्यापही पूर्ववत सुरु झाली नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे एस टी प्रशासनास वारंवार कल्पना देऊन देखील याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या १६ ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना सोबत घेऊन एस.टी.महामंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा पंचायत समिती सभापती संजय गायकवाड यांनी दिला.  

याबाबत माहिती देताना सभापती संजय गायकवाड यांनी,महाबळेश्वर तालुक्यातील जुलै महीन्यातील अतिवृष्टी मुळे आस्मानी संकट कोसळले तालुक्यातील मुख्य आंबेनळी घाटरस्ता,तापोळा घाटरस्त्यासह गावांना जोडणारे रस्ते खचणे,पूल वाहून जाणे,दरडी कोसळून अनेक गावांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे वाहतुक पुर्ण बंद झाली होती तालुक्यातील ११३ गावांपैकी पश्चिम भागातील ८५ हुन अधिक गावांचा संपर्कच तुटला आ मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविली सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे पूर्ण झाली मात्र या विभागामध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील अद्यापही एस टी सेवा सुरु करण्यात आली नाही रस्ते दुरुस्थ करण्यात आल्याची ट्रायल मी स्वतः एस टी ने मौजे शिरवली गावापर्यंत घेतली त्यावेळी महामंडळाने एक-दोन ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्थी सुचविल्यानंतर ती दुरुस्थी करून हे रस्ते सुस्थितीत असल्याबाबतचा पत्रव्यवहार देखील करण्यात आला एस टी सेवा सुरु करण्याबाबत आ मकरंद पाटील यांनी देखील दूरध्वनीवरून महामंडळास सूचना देऊन देखील कोणतीही दखल एस टी महामंडळाने घेतली नाही महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी श्री गायकवाड याना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नाही

गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील एस टी सेवा बंदच होत्या तर जुलै महिन्याच्या अतिवृष्टीमुळे अनेकांगावे दीड महिना संपर्कहीन होती आता रस्ते दुरुस्थी होऊन एस टी महामंडळास वारंवार कल्पना देऊन पत्रव्यवहार करून देखील एस टी महामंडळ जाणीवपूर्वक दुर्गम भागात एस टी सेवा सुरु केली नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळेच एस.टी. सेवा ही तालुक्यातील जनतेच्या उपयोगी पडत नसेल तर हा एस. टी. डेपोच कशाला यासाठी शनिवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना सोबत घेऊन एस. टी. महामंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा पंचायत समिती सभापती संजय गायकवाड यांनी दिला. 000

Share this story