आम्ही आश्वासन देत नाही तर दिलेला शब्द पाळतो

pathdive-udayanraje
साताऱ्यातील पथदिव्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा : सातारा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्या आहेत. आम्ही केवळ आश्वासन देत नसून दिलेले शब्द पाळतो, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्या नगर विकास आघाडीला लगावला आहे.

स्ट्रीट लाईट जोडणी कामाचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आला. शाहू चौक (केसरकर पेठ) इंदिरानगर वसाहत (विलासपूर) बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजिंक्यतारा चौक (शाहूनगर) मोळाचा ओढा (करंजे ) येथील पथदिवे खासदार उदयनराजे भोसले यांनी रिमोट द्वारे सुरू केले. पथदिव्यांच्या या लोकार्पण प्रसंगी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड डी जी बनकर, संग्राम बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट , यावेळी उपस्थित होते . या पथदिव्यां च्या लोकार्पणासाठी पालिकेने स्वनिधीतून पन्नास लाख रूपये खर्च केले आहेत .

या लोकार्पण प्रसंगी खासदारांनी नेहमीच्या शैलीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव घेता त्यांना टोला लगाविला . खासदार उदयनराजे म्हणाले आम्ही केवळ आश्वासन देत नसून दिलेले शब्द पाळतो. सातारा विकास आघाडीकडून लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करत आलो आहोत.आम्ही केवळ आश्वासन देत नसून दिलेले शब्द पाळतो उदयनराजे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आमदार खासदार गटाचे आंतरविरोध समोर आले आहेत .दरम्यान येणाऱ्या काळात सातारा पालिका निवडणुकीत चुरस वाढणार आहे. 000

Share this story