कपिल शर्मांच्या आयुष्यावर बनणार बायोपिक 'फनकार'  

Kapil Sharma

मुंबई/ प्रतिनिधी 

कपिल शर्मा हे छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत नावाजलेले एक प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांचा 'कॉमेडी नाईट विथ कपिल' हा शो अनेक वर्षांपासून 'सोनी' वाहिनीवर प्रसारित होत आहे. कपिलच्या या शोमध्ये सर्व मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. कपिल शर्मा यांनी आपल्या मेहनतीने आणि क्षमतेने मनोरंजन क्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटविला आहे. मात्र, हा प्रवास सहज सोपा निश्चितच नाही. त्यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. 

सेलिब्रिटी होण्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंबाबत त्यांचे चाहते आणि प्रेक्षक अनभिज्ञ आहेत. मात्र, आता कपिलच्या अशा पडद्यामागच्या पैलूंची माहिती घेण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. कपिल यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविला जाणार आहे.  Kapil Sharma shares first photo of son Trishaan, daughter Anayra on 'public  demand', sends wishes on Father's Day | Entertainment News,The Indian  Express

कपिल शर्मा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे शीर्षकही 'फनकार' असणार आहे. मात्र, या चित्रपटात कपिल यांची भूमिका ते स्वतः साकारणार की ती भूमिका अन्य अभिनेता करणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 'फनकार'चे दिग्दर्शन 'फुक्रे'चे दिग्दर्शक मृगदीप सिंग करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती महावीर जैन आणि चेन्नईस्थित लायका प्रॉडक्शन करणार आहे. 

ICYMI: Kapil Sharma Reveals Baby Son's Name In Twitter Chat With Neeti Mohan

कपिल शर्माबद्दल हे प्रतिभावान आणि हरहुन्नरी कलावंत आहेत. आपल्या विनोदाने ते प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. ते एक उत्तम गायकही आहे. 'कॉमेडी नाईट'मध्ये त्यांचे गाणे अनेकांनी ऐकले आहे. कपिल यांनी 'किस किस को प्यार करूं' या चित्रपटातही अभिनय केला आहे. कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवर पदार्पण करणार आहेत. नुकताच त्याचा प्रोमोही प्रसिद्ध करण्यात आला आहे. 
 

Share this story