परमवीर सिंग मुंबईत: गुन्हे शाखेत हजेरी 

Parambir Singh

मुंबई/ प्रतिनिधी 

सुमारे ७ महिन्यांपासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले असून त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजेरी  लावली. सिंग हे चंदिगढ येथून मुंबईत आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना फरारी घोषित करून तशी पाटी त्यांच्या निवासस्थानी लावण्यात अली होती. आपला न्यायसंस्थेवर विश्वास असून न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपण तपासात सहकार्य करू; असे सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सिंग यांना वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान 'अँटिलीया' नजीक स्फोटकांनी भरलेली गाडी लावण्याच्या प्रकरणी अटक झाल्यानंतर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात आले आहे. विमानतळावरून सिंग यांनी थेट मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभाग ११ येथे हजेरी लावली. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात सिंग यांचा जबाब या ठिकाणी नोंदवून घेतला जाणार आहे. उच्च न्यायालयाने सिंग यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. 

सध्या गृहरक्षक दलाचे महासंचालक असलेल्या सिंग यांनी ४ मे नंतर आजारपणाची राजा घेतली. मुंबई पोलिसांनी सिंग हे बेपत्ता असल्याचे २० ऑक्टॉबर रोजी जाहीर केले. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटविल्या नंतर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. त्यांच्या आरोपामुळे देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांना अटक करून दरमहा १०० कोटीच्या खंडणीचा तपास सुरू आहे. देशमुख यांच्यावर आरोप करणारे पात्र लिहिणाऱ्या सिंग यांच्यावरही खंडणीखोरीसह अन्य प्रकाराचे ६ गुन्हे दाखल आहेत.    
 

Share this story