सांगवीत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

Baramati

बारामती/ प्रतिनिधी  

कोरोना कालावधीत रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सांगवी (ता. बारामती ) येथील आरोग्य केंद्रात सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सांगवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जनार्दन सोरटे, औषध निर्माण अधिकारी सुनिल परकाळे, लॅब टेक्निशियन संजय चौरे, वाहन चालक बापूराव  जगताप, जावेद मुलाणी,माया चव्हाण, संजय गलांडे, रेश्मा वाघमोडे,उर्मिला मदने, तारा बुधावले व आशा स्वयंसेविका यांचा ह्युमन राईट ऑफ इंडिया यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कोरोना कालावधीत असंख्य कोरोना रुग्णांना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तसेच आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली गावांत वेळोवेळी करण्यात आलेले आरोग्य सर्वेक्षण,उत्कृष्टरित्या केलेले लसीकरण याची दखल घेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

विशेषत: वैद्यकीय अधिकारी जनार्दन सोरटे, व रुग्णवाहिका चालक बापूराव जगताप या कोरोना योध्यांचं भरभरून कौतुक करून सन्मानपत्र देऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन स्वतःचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी ह्युमन राईट ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष सातारा बबनराव बापूराव मदने, कथाकथानकार प्राध्यापक रवींद्र कोकरे,ह्युमन राईट ऑफ इंडिया तालुका उपाध्यक्ष जनरल सेक्रटरी सातारा राजेंद्र मदने, ह्युमन राईट ऑफ इंडिया बारामती तालुका सेक्रेटरी डी.बी.सराफ, दत्तात्रेय काळे उपस्थित होते.
 

Share this story