फलटण एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ (ट्रस्टी) निवड बिनविरोध : श्रीमंत रामराजे अध्यक्ष

phaltan-education
श्रीमंत विश्वजीतराजे व श्रीमंत सत्त्यजीतराजे यांचा समावेश

फलटण/प्रतिनिधी : सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी फलटण एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ (ट्रस्टी) निवड बिनविरोध पार पडली आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या असून श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजीतराजे नाईक निंबाळकर या तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे, तर हंबीरराव मानाजीराव भोसले  यांचे सुपुत्र शिरीष उर्फ संजय भोसले आणि आर. व्ही. निंबाळकर यांचे  सुपुत्र रणजित नाईक निंबाळकर यांना ही संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना अध्यक्षपदावर पुन्हा निवडण्यात आले असून उपाध्यक्षपदी प्राचार्य विश्वासराव मुगुटराव देशमुख, अशोक जीवराज दोशी, जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री), फेलोज मधून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, अरविंद रुपचंद शहा (वडूजकर), बेनीफेक्टर्स मधून श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पृथ्वीराज विजयसिंह राजेमाने, शिरीष शरदकुमार दोशी, रणजीत रामचंद्र निंबाळकर, ऑर्डीनरी मधून रमणलाल आनंदलाल दोशी, डॉ. पार्श्वनाथ पुरुषोत्तम राजवैद्य, हेमंत वसंतराव रानडे, नितीन शांतीलाल गांधी, शिरीष उर्फ संजय हंबीरराव भोसले, सिंपथायझर्स मधून भोजराज विठ्ठलराव नाईक निंबाळकर, शिवाजीराव बाबुराव घोरपडे,  तसेच प्राचार्य मुधोजी महाविद्यालय, फलटण डॉ. पंढरीनाथ हरिभाऊ कदम, नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट प्रतिनिधी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शरद विश्वासराव रणवरे, शाखा प्रमुख (दरवर्षी बदलतात) प्राचार्य बाबासाहेब महादेव गंगावणे, निवृत्त शिक्षक चंद्रकांत दिनकर पाटील, महिला सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत यशोधराराजे उदयसिंहराजे नाईक निंबाळकर, सौ. नूतन अजितराव शिंदे, सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर.

बोर्ड ऑफ ट्रस्टीज

रामचंद्र भाऊसाहेब फडतरे, चंद्रकांत यशवंतराव रणवरे.

Share this story