राजू घोडेवाला याची माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस

raju-ghodewala1
महाबळेश्वर पोलिसांची घोषणा

महाबळेश्वर :  शौचालयावरून परत घरी येत असलेल्या आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून जाळून मारणारा आरोपी राजू घोडेवाला उर्फ राजेंद्र महादेव जाधव (वय 55) रा. व्हॅली व्हयु रोडवरील चाळ, महाबळेश्वर हा आरोपी गेल्या पंधरा दिवसापासून फरार आहे. या आरोपीची माहिती देणाऱ्यास महाबळेश्वर पोलिसांनी रोख बक्षिस जाहीर केले आहे.

माणुसकीला काळीमा फासणारया एका घटनेने दि.१ सप्टेंबर रोजी महाबळेश्वर हादरले होते. सकाळी शौचालयावरून घरी परत येत असलेल्या आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देणारा नराधम पती राजेंद्र महादेव जाधव उर्फ राजू घोडेवाला हा घटना स्थळावरून फरार झाला होता. या आरोपीच्या शोधासाठी महाबळेश्वर पोलिसांनी तीन पथके वेगवेगळया दिशेने रवाना केली होती. ही तीनही पथके हात हलवित परत आली. या तीनही पथकाला हा अरोपी सापडला नाही. गेली पंधरा दिवस महाबळेश्वर पोलिस या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. एकदा काही नागरीकांनी दारूच्या गुत्त्यावर या आरोपीस पाहिले होते, परंतु त्या दिवशीही पोलिसांच्या हाती हा आरोपी लागला नाही. शहर परीसरातील जंगलात हा आरोपी लपला असल्याची खात्री महाबळेश्वर पोलिसांना आहे. या आरोपीचा शोध घेण्यासाठी नागरीकांच्या मदत घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. म्हणुन नागरीकांना या आरोपीची माहीती देण्याचे पोलिसांनी सोशल माध्यमावर आवाहन केले आहे. माहिती देणारांचे नाव गुप्त ठेवले जाणार असून माहीती देणारास पोलिस विभागाकडून रोख बक्षिसही दिले जाणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.

पत्नीला पेटवून दिल्यानंतर चाळीतील स्थानिक नागरकांनी आग विझवून महीलेला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. या दुर्दैवी महीलेवर मुंबई येथील कस्तुरबा गांधी या रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु दि. ८ सप्टेंबर रोजी या महिलेचे निधन झाले. प्रारंभी महाबळेश्वर पोलिसांनी आरोपीवर 307 कलमा नुसार गुन्हा दाखल केला होता. परंतु जखमी महीलेचे निधन झाल्या नंतर पोलिसांनी आरोपीवर 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वर पोलिसांनी केलेल्या आवाहनास महाबळेश्वर येथील नागरीक नक्कीच प्रतिसाद देतील, असा विश्वास महाबळेश्वर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share this story