खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यात नवीन बीएमडब्ल्यू

bmw

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये असून त्यांनी या ही कारला एमएच ११ डी डी ००७ हा त्यांचा लकी नंबर घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व्हायरल झाले असून महाराजांची ही अलिशान नवीन गाडी साताऱ्यात कधी येणार याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.

साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना गाड्यांचा छंद आहे. तसेच या गाड्यांसाठी ते 007 हा क्रमांक आवडीने घेतात. त्यांच्याकडे पल्सर बाईकसह इनोव्हा, जिप्सी, रेंज रोव्हर, फोर्ड या कंपन्यांच्या अलिशान गाड्या आहेत. तसेच त्यांना बुलेटचीही आवड आहे. ते त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याची बुलेट घेऊन सातारा शहरातून कधी कधी आवडीने फेरफटकाही ते मारतात.

आता त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात बीएमडब्लू कंपनीची अलिशान कार दाखल झाली आहे. ही कार त्यांनी पुण्यातून विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदी केली आहे. उदयनराजेंच्या या नव्या कोऱ्या अलिशान कारची किंमत एक कोटी रूपये असून या कारलाही त्यांनी आपला लकी नंबर ००७ हा क्रमांक घेतला आहे. कार सोबतचे फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सातारकरांना आता उदयनराजे भोसले ही नवी कार घेऊन साताऱ्यात कधी येणार याची उत्सुकता आहे. 000

Share this story